मुंबई – भडकलेल्या इंधन दरामुळे महागाईचा चढता आलेख रोखण्यासाठी केेंद्र सरकारने काल पेट्रोल व डिझेलच्या केंद्रीय उत्पादन शुल्कात कपात केली होती. केेंद्राच्या या निर्णयानंतर आज राज्य सरकारनेही पेट्रोल आणि डिझेलवरील मुल्यवर्धित करात (व्हॅट) कपात करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार पेट्रोल 2.8 रुपयांनी तर डिझेल 1.44 रुपयांनी स्वस्त झाले आहे. या निर्णयामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर सुमारे वार्षिक 2500 कोटी रुपयांचा भार पडणार आहे.
केंद्र आणि राज्य सरकारने कमी केलेल्या करामुळे पेट्रोल 11 रुपये 58 पैशांनी स्वस्त झाले आहे. तर डिझेल 8 रुपये 44 पैशांनी स्वस्त झाले आहे.
मुल्यवर्धित कर कमी केल्याने पेट्रोलकरिता 80 कोटी रुपये महिन्याला आणि 125 कोटी रुपये डिझेलकरिता इतके महसुली उत्पन्न कमी होणार आहे. 16 जून 2020 ते 4 नोव्हेेंबर 2021 या कालावधीत केेंद्र सरकार पेट्रोल व डिझेलवर अनुक्रमे 7 रुपये 69 पैसे आणि 15 रुपये 14 पैसे प्रति लीटर कर आकारत होते. मार्च आणि मे 2020 मध्ये केेंद्राने पेट्रोल आणि डिझेलच्या अबकारी करात अनुक्रमे 13 आणि 16 रुपये वाढ केली होती. आता व्हॅट कमी करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यानंतर मुंबईत पेट्रोल 109 रुपये 45 पैसे प्रति लीटर, नाशिकमध्ये 109 रुपये 75 पैसे प्रति लीटर, परभणीत 111 रुपये 77 पैसे प्रति लीटर दराने उपलब्ध
होणार आहे.