संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 14 August 2022

केतकी चितळेला दिलासा नाही! जामीनावर १६ जूनला सुनावणी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट करणारी केतकी चितळे हिला आजही कोर्टाने दिलासा दिला नाही. तिला आज हि जमीन मिळाला नसून तिच्या जामीन अर्जावर सुनावणी 16 जूनला सुनावणी होणार आहे.

वर्ष 2020 मध्ये अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार केतकी चितळेविरोधात गुन्हा दाखल झाला होता. केतकीने सोशल मीडियावर अनुसूचित जातींच्या व्यक्तींविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केली होती. या पोस्ट प्रकरणी अॅड. स्वप्नील जगताप यांनी रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. याप्रकरणी तिला जामीन मिळावा याकरिता तिने आज न्यायलात अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर आता 16 जूनला सुनावणी होणार आहे.

अभिनेत्री केतकी चितळेने 1 मार्च 2020 रोजी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती. यात तिने अनेक धर्मांचा उल्लेख केला होता. यात तिने नवबौद्धांवरची तिची मते मांडली होती. नेमकी याच गोष्टीमुळे आता तिच्याविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नुकतंच समोर आलेल्या माहितीनुसार, केतकी चितळेच्या जामीन अर्जावर सुनावणी 16 जूनला सुनावणी होणार आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami