संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 12 August 2022

‘कोई मिल गया’ ,’ क्रिश फेम अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी यांचे निधन !

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – हिंदी चित्रपट सृष्टी आणि टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेते मिथिलेश कुमार यांचे निधन झाले आहे.मिथिलेश यांनी 3 ऑगस्ट रोजी संध्याकाळी लखनऊमध्ये अखेरचा श्वास घेतला.त्यांना हृदयविकार होता.त्यांचे जावई आशिष चतुर्वेदी यांनीच त्यांच्या निधनाबद्दल सोशल मीडियावर माहिती दिली आहे. मिथिलेश चतुर्वेदी यांना काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता, त्यानंतर ते त्यांच्या मूळ गावी लखनऊला गेले होते.

मिथिलेश चतुर्वेदी यांनी अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत काम केले. फिजा, कोई मिल गया, क्रिश, सत्या,गदर: एक प्रेम कथा, मोहल्ला अस्सी आणि रेडी यांसह अनेक चित्रपट आणि जाहिरातींमध्ये काम केले आहे.तसेच अलीकडच्या काळात ते ’स्कॅम 1992: द हंसल मेहता स्टोरी’ या वेब सीरिजमध्येही ते दिसले होते. ’कोई मिल गया’ या चित्रपटातील मिथिलेश यांच्या कास्टिंगची कथा खूपच रंजक आहे. खरं तर, राकेश रोशन जेव्हा या चित्रपटावर काम करत होते, त्या काळात त्यांनी ’फिजा’ हा चित्रपट पाहिला होता. या चित्रपटात एक सीन होता, ज्यामध्ये करिश्मा कपूर मिथिलेश यांच्या तोंडावर पाणी फेकते. तो सीन पाहून राकेश रोशन मिथिलेश यांच्यावर खूप खुश झाले आणि त्यांनी मिथिलेश यांना बोलावून घेतले आणि चित्रपटातील भूमिकेसाठी राजी केले होते. अमिताभ बच्चन यांचा गुलाबो सीताबो हा त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami