संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 09 August 2022

कोकणातील रिफायनरी विरोधकांचे पुन्हा आंदोलन

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

राजापूर : कोकणातील रिफायनरी विरोधक १० ते १४ ऑगस्ट या दरम्यान साखळी उपोषण करणार आहेत. रिफायनरीविरोधी संतप्त ग्रामस्थांवर चुकीची कलम लावत त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत, असा दावा आंदोलकांनी केला आहे. त्याविरोधात राजापूर शहर पोलीस ठाण्याच्या आवारात साखळी उपोषण केले जाणार आहे. याबाबतचे एक पत्र विभागीय अधिकारी राजापूर यांना देण्यात आले आहे. यामध्ये धोपेश्वर, गोवळ, सोलगाव, शिवणे खुर्द, देवाचे गोठणे, राजवाडी, वाडा तिवरे, साखरी नाटे, नाटे, अंबोळगड आणि धाऊलवल्ली या गावचे ग्रामस्थ सहभागी होणार आहेत. रिफायनरेशन ड्रोन आणि माती परीक्षणाला स्थानिकांनी विरोध केला होता. या आंदोलनात सहभागी झालेल्या ग्रामस्थांवर पोलिसांनी चुकीची कलम लावली आहेत ग्रामस्थांचा आरोप आहे. त्याविरोधात हे साखळी उपोषण केले जाणार आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami