रत्नागिरी – मान्सून कोकणात दाखल झाला आहे.मान्सूनसाठी कोकण रेल्वेने पूर्ण तयारीही केली आहे.तसेच आता मान्सून वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. हे वेळापत्रक काल शुक्रवार पासून लागू करण्यात आले असून या मार्गावरील गाड्या पावसाळी वेळापत्रकानुसार १० जून ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत धावणार आहेत.
मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सर्व गाड्या या कोकण रेल्वे स्थानकावार एक ते दोन तास लवकर येणार आहेत. पावसाळ्यात रेल्वे मार्गावरील दुर्घटना टाळण्यासाठी प्रतिवर्षाप्रमाणे रेल्वेने हा बदल केला आहे. त्यामुळे गाड्याच्या वेगावर मर्यादा येणार आहे.प्रवाशांच्या सुरक्षितेमुळे रेल्वेने वेगावर आणि वेळेवर नियंत्रण आणले असून गाड्यांच्या पावसाळी वेळापत्रकात बदल केला आहे.त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्याच्या प्रत्येक स्थानकावर येण्याच्या आणि जाण्याच्या वेळेत बदले केला आहे.यानुसार सावंतवाडी स्थानकातून सुटणारी तुतारी एक्सप्रेस उद्यापासून सायंकाळी ५.५५ वाजता सुटणार आहे. ही गाडी कुडाळ येथे ६.१६ वाजता, कणकवलीत ६.४८ वाजता आणि वैभववाडीत सायंकाळी ७.२२ वाजता पोहचणार आहे. सावंतवाडीहून दिव्याकडे जाणारी दिवा पॅसेंजर गाडी सावंतवाडी येथून सकाळी ८.२५ वाजता सुटून कुडाळ येथे ८.४७ , कणकवली ९.२१ आणि वैभववाडीला सकाळी १० वाजता पोहचणार आहे.
तसेच मडगावहून मुंबईकडे जाणारी कोकण कन्या एक्सप्रेस सावंतवाडीला सायंकाळी ६.३० वाजता येईल.कुडाळ ६.५०,कणकवली ७.२० तर वैभववाडीला ७.५८ वाजता येईल. मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस सावंतवाडीला दुपारी १.१८ वाजता, कुडाळ १.४० वाजता तर कणकवलीत २.१० वाजाता पोहचेल.मांडवी एक्सप्रेस सावंतवाडी येथे सकाळी १०.४ वाजता, कुडाळ १०.२४ वाजता, कणकवली ११.०२ तर वैभववाडी येथे ११.३२ वाजता सुटेल. कणकवली स्थानकावर पहाटे येणारी मंगला एक्सप्रेस आज पासून पहाटे ५.०२ वाजता पोहचेल तर ओका एक्सप्रेस दुपारी १.०२ वाजता दर शनिवारी आणि गुरूवारी थांबेल.मेंगलोर एक्सप्रेस कणकवली स्थानकावर मध्यरात्री १२.८० वाजता सुटणार आहे. कुडाळ स्थानकावर थांबणारी मत्स्यगंधा एक्सप्रेस रात्री ८.५० वाजता सुटेल.कोचिवली ते इंदोर ही गाडी कुडाळा स्थानकावर पहाटे ४.४० वाजता सुटेल तर नियमित धावणारी नेत्रावती एक्सप्रेस पहाटे ५.३२ वाजता सुटणार आहे.