सातारा – कोयना धरणातील उपलब्ध पाणीसाठा शेती सिंचनासाठी आरक्षित असल्याने पश्चिमेकडील वीजनिर्मितीवर मर्यादा आल्या आहेत. धरणाच्या पायथा वीजगृहातून सुरू असलेला विसर्गही शुक्रवारी सकाळी बंद करण्यात आला आहे. धरणात सध्या 15 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.
पुर्वेकडील सिंचनासाठी धरणाच्या पायथा वीजगृहातून नदीपात्रात पाणी सोडण्यात येत होते. परंतु, पावसाने दडी मारल्याने धरणातील पाणीसाठा कमालीचा खालावला. पश्चिमेकडील वीजनिर्मितीसाठी 0.2 टीएमसी आणि पायथा वीजगृहातून 2100 क्युसेक पाणी सिंचनासाठी सोडण्यात येत होते. आज सकाळी पायथा वीजगृहातील विसर्ग बंद करण्यात आला आहे. वीजनिर्मितीसाठी पाण्याचा वापर कमी करण्यात आला आहे. त्यामुळे वीजमिर्मिती कमी क्षमतेने होत आहे. 1 जूनपासून पश्चिमेकडील वीज प्रकल्पासाठी 2.8 टीएमसी आणि पुर्वेकडील सिंचनासाठी 2.44 टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे.