संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 20 August 2022

कोरोनाचे संपला तरी मुरुडचे शासकीय
विश्रामगृह ग्रामीण रुग्णालयाच्या ताब्यात

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

रायगड- २२ मार्च २०२० पासुन या देशावर कोरोनाचे महामारीचे मोठे संकट आले होते. यावेळी रुग्णालयात रुग्ण सुविधा कमी पडत असल्याने शाळा, महाविद्यालय, शासकीय विश्रामगृह ताब्यात घेऊन या ठिकाणी कोविड केंद्र सुरू करण्यात आली होती. काही महिन्यांपासून हे संकट सरल्याने राज्यभरातील निर्बंध उठवले तरी मुरुडचे शासकीय विश्रामगृह अजून काही कोरोनाच्या कचाट्यातून मुक्त झालेले नाही. त्यामुळे मुरुड जंजिरामध्ये अनेक शासकीय अधिकारी, कर्मचारी,पर्यटक येत असतात, त्यांच्या निवासाची गैरसोय होत आहे.तसेच हे विश्रामगृह वापरातच नसल्याने त्याची दुरवस्था झाली आहे.
कोरोनाची लाट उसळली होती ती आता ओसरली आहे. सर्व नियम शिथील करण्यात आले आहेत. सर्व पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहेत. सर्व शाळा, महाविद्यालय पुर्णपणे सुरू झाली आहेत. पर्यटक मुरुडला येऊ लागले आहेत. तरी हे मुरुडचे शासकीय विश्रामगृह अजूनही कोरोनाच्या कचाट्यातून मुक्त झालेले नसल्याने हे विश्रामगृह कोरोनाच्या कचाट्यातून कधी मुक्त होणार? असा सवाल केला जात आहे.शासनाच्या संबंधित महसूल,आरोग्य व सार्वजनिक बांधकाम खात्याने यात लक्ष पुरवून सार्वजनिक बांधकाम खात्याचे विश्रामगृह लवकरात लवकर खुले व्हावे.अशी भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान,जरी हे विश्रामगृह आता सार्वजनीक बांधकाम विभागाकडे सोपवले तरी त्याची सध्याची दुरवस्था पाहता त्याच्या डागडुजीसाठी मोठा खर्च येणार आहे.त्यामुळे या विश्रामगृहाची दुरुस्ती करूनच मग हे विश्रामगृह ताब्यात द्यावे असे मत मुरुड सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपअभियंता गोरे यांनी व्यक्त केले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami