संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 15 August 2022

कोरोनासोबत स्वाईन फ्लूदेखील फोफावतोय; कोल्हापुरात एका महिलेचा मृत्यू

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

कोल्हापूर – कोरोनातून सावरत असलेल्या महाराष्ट्रावर ऐन पावसाळ्यात आता मंकीपॉक्स आणि स्वाईन फ्लूचे संकट ओढावले आहे. राज्यभरात स्वाईन फ्लूच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. कोल्हापूरच्या पाचगाव येथील एका महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला आहे. मालूताई कांबळे असे या ६६ वर्षीय मृत महिलेचे नाव आहे.

मालूताईंना स्वाईन फ्लू झाल्याचे १५ जुलै रोजी चाचणीतून समोर आले होते. जवळपास आठवडाभर त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र प्रकृतीने साथ न दिल्यामुळे उपचारदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून सर्व नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच शासकीय रुग्णालयात विशेष कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. दरम्यान, संपूर्ण जिल्ह्यात सहा रुग्णांवर उपचार सुरू आहे.

स्वाईन फ्लूमध्ये नाकातून पाणी गळणे, सर्दी होणे, अशी लक्षणे आढळतात. तर कोरोनामध्ये ताप येणे, चव जाणे, वास न येणे, अशी लक्षणे आढळतात. परंतु स्वाईन फ्लूची काही लक्षणे कोरोनासारखीच असतात. त्यामुळे आजार ओळखणे हे थोडे अवघड आहे. मात्र दोन्ही आजारांची उपचार पद्धती वेगळी असल्यामुळे आजार नेमका कोणता आहे, हे सुरुवातीलाच ओळखणे आवश्यक असल्याचे ग्लोबल रुग्णालयाचे फुफ्फुसरोग तज्ज्ञ डॉ. हरीश चाफले यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. दोन्ही आजारांसाठी चाचणी करणे गरजेचे आहे. तसेच दोन्ही आजार होऊ नये यासाठी मास्क घालणे आवश्यक आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami