संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 18 August 2022

कोल्हापूर विमानतळावरील ‘नाईट लँडिंग’ला परवानगी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

कोल्हापूर: कोल्हापूर विमानतळाला नाईट लँडिगची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे कोल्हापूर विमानतळ रात्रभर सुरू राहणार आहे. कोल्हापूर विमानतळावरील नाईट लँडिंग आणि विस्तारित धावपट्टीला नागरी विमान उड्डाण प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे. यामुळे कोल्हापूर परिसरातील पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. तसेच विमानतळावरील धावपट्टी १३७० मीटरवरून १९३० मीटर इतकी विस्तारित झाली आहे. त्यामुळे एअर बससारखी मोठी विमाने या विमानतळावर उतरू शकतील. कोल्हापूर विमानतळावर नाईट लँडिंग सुविधा सुरू करावी, अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून होत होती अखेर या मागणीला यश मिळाले आहे.

कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी या सरकारच्या या निर्णयाचा आनंद व्यक्त केली आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले की, अनेक दिवसांपासून प्रलंबित असणाऱ्या कोल्हापूर विमानतळावरील नाईट लँडींग सुविधा तसेच विस्तारीत धावपट्टीला (१३७० मी. वरून १९३० मी. पर्यंत) भारतीय विमानतळ प्राधिकरणाची आज मान्यता मिळाली. कोल्हापूरच्या विकासाच्या वाटेवरचा माईल स्टोन ठरणाऱ्या दोन महत्वाच्या योजनांना भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून आज मंजुरी मिळाली. त्यामुळे प्रदिर्घकाळ चर्चेत असलेला आणि रेंगाळलेला कोल्हापूर विमानतळ विकासाचा प्रश्‍न आता मार्गी लागला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami