संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 14 August 2022

कोस्टल रोडच्या दुसर्‍या बोगद्याचे
१ हजार मीटरचे खोदकाम पूर्ण !

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- मुंबईतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या कोस्टल रोड प्रकल्पाच्या कामाला आता चांगलाच वेग आला आहे. ठरलेल्या वेळेपूर्वीच पहिला बोगदा खोदण्यात यश आलेल्या ‘मावळा’ने ( टीबीएम मशीन) दुसऱ्या बोगद्याचा १ हजार मीटरचा टप्पा फत्ते केला आहे. डिसेंबर २०२२ पर्यंत दुसऱ्या बोगद्याचे काम पूर्ण होईल आणि डिसेंबर २०२३ अखेरपर्यंत कोस्टल रोड मुंबईकरांच्या सेवेत असेल, अशी माहिती या कोस्टल रोड प्रकल्पाचे प्रमुख अभियंता चंद्रकांत कांडलकर यांनी काल शुक्रवारी दिली.
मुंबईतील महत्त्वपूर्ण प्रकल्प असलेल्या कोस्टल रोडच्या कामाला वेग आला आहे. जमीनीखाली १० ते ७० मीटर खोल दोन बोगदे खोदले जात असून चार मजली इमारतीची उंची असणाऱ्या मावळ्याने २.०७२ किलोमीटरचा पहिला बोगदा खोदण्याचा टप्पा ११ जानेवारी २०२२ रोजी पार केला आहे. तर दुसऱ्या बोगद्याच्या कामासाठी ३० मार्च रोजी मावळ्याने कूच केली आहे. छोटा चौपाटी ते प्रियदर्शनी पार्क २.०७२ किलोमीटरपर्यत बोगदा खोदण्यात येत असून साडेतीन महिन्यांच्या कालावधीत १ हजार मीटरचे अंतर पार केल्याने पुढील सहा महिन्यांत दुसरा बोगद्याचे काम पूर्ण होईल,असा विश्वासही कांडलकर यांनी व्यक्त केला आहे.२०१८ मध्ये सुरू झालेल्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे काम पालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल यांच्या नेतृत्वाखाली आणि अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या गतीने सुरू आहे.खरे तर या प्रकल्पातील बोगदा खोदण्याचे काम मावळा ने गेल्या वर्षी ११ जानेवारीला सुरू केले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami