नवी दिल्ली – क्रिप्टोकरन्सी सागरी चाचांसारखी आहे, असे मत भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन यांनी व्यक्त केले. क्रिप्टोकरन्सीची फियाट चाचणी शिल्लक आहे, असे त्यांनी सांगितले.
सर्वसाधारण चलनाशी क्रिप्टोकरन्सीची तुलना केली तर तिचे मूल्य, व्यापक स्विकार्हता आणि मौद्रिक एकक यासारख्या मूलभूत आवश्यकता ते पूर्ण करत नाही. ते अधिक विकेंद्रित झाले आहे. वॉचडॉग किंवा केंद्रीकृत नियमन प्राधिकरणाच्या गैरहजेरीत ते सागरी चाच्यांसारखे आहे. जिथे विजेता सर्वकाही घेऊन जातो, असे नागेश्वरन यांनी सांगितले.