संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 16 August 2022

खेडच्या शिवसेनेच्या बैठकीत कदम समर्थकांची घोषणाबाजी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

खेड- खेडचे माजी मंत्री आणि शिवसेनेचे बंडखोर नेते रामदास कदम यांनी आपल्या नेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर खेड तालुका शिवसेनेची महत्त्वाची बैठक आज सकाळी ११ वाजता पार पडली आहे.मात्र या बैठकीत बंडखोर गटातील रामदास कदम आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांमध्ये बाचाबाची झाली. शिवसेनेच्या बैठकीतच कदम समर्थकांनी रामदास कदम आणि आमदार योगेश कदम यांच्या विरोधात जर बोलाल तर आम्ही खपवून घेणार नाही असा इशारा ठाकरे समर्थकांना दिला आहे. सदर बैठकीत उपस्थित कदम समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

शिवसेना बंडखोर नेते रामदास कदम यांची शिवसेनेतून त्यांच्या हकालपट्टीची झाली. या पार्श्वभूमीवर शनिवारी खेड तालुक्यातील प्रमुख शिवसेना पदाधिकारी, युवा सेना पदाधिकारी तसेच महिला आघाडीच्या प्रमुख पदाधिकार्यांची महत्त्वाची बैठक भरणे नाका येथील हॉटेल बिसू येथे आज झाली. ही बैठक सुरू झाल्यानंतर विविध विषय आणि पक्षाशी एकनिष्ठ राहणे यावर जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन सुरू केले . त्यानंतर माजी तालुकाप्रमुख राजा बेलोसे आणि युवासेना जिल्हाधिकारी अजिंक्य मोरे यांनी आमदार योगेश कदम आणि माजी मंत्री रामदास कदम यांच्या विरोधात बोलायला सुरुवात केली. त्यामुळे बैठकीत उपस्थित कदम समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर त्या बैठकीतून माजी तालुकाप्रमुख राजा बेलोसे आणि युवासेना जिल्हा अधिकारी अजिंक्य मोरे यांनी पळ काढला.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami