जालना- एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आता ईडीकडून शिवसेना नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या संबंधीत रामनगर सहकारी साखर कारखान्यावर ईडीने मोठी कारवाई केली. या कारखान्याची 200 एकर जागा, कारखान्याची इमारत आणि कारखान्यात असलेली यंत्रसामग्री जप्त केली.
कारखान्याच्या जमिनीचा जो व्यवहार झाला आहे. त्यामध्ये अनियमितता आढळल्याचा ठपका ईडीने आहे. याच आरोपांप्रकरणी संबंधित कारवाई करण्यात आल्याचे ईडीच्या अधिकार्यांनी सांगितले. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जालन्यातील रामनगर साखर कारखाना खरेदी प्रकरणी अर्जुन खोतकर यांच्यावर 100 कोटी घोटाळ्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यानंतर 26 नोव्हेंबर 2021 रोजी ईडीचे एक पथक खोतकर यांच्या घरावर दाखल झाल होते. त्यांनी रामनगर साखर कारखाना खरेदीप्रकरणी खोतकरांची कसून चौकशी केली होती. ईडीच्या अधिकार्यांनी खोतकरांची सलग 12 तास चौकशी केली.