संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 20 August 2022

गणेशोत्सवासाठी पश्‍चिम रेल्वेच्या 60 विशेष गाड्या

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – गणेशोत्सवासाठी पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून मुंबई सेंट्रल आणि वांद्रे स्थानकांतून 60 विशेष रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई सेंट्रल ते ठोकुर यादरम्यान 6 फेर्‍या होणार असून 23 आणि 24 ऑगस्टला या फेर्‍यांना सुरुवात होईल. तसंच मुंबई सेंट्रल ते मडगाव या मार्गावर 34 फेर्‍या होतील. या फेर्‍या देखील 24 ऑगस्टपासून सुरू होणार आहेत.
दुसरीकडे, वांद्रे टर्मिनस ते कुडाळ (6 फेर्‍या), उधना ते मडगाव (4 फेर्‍या) आणि अहमदाबाद ते कुडाळ (6 फेर्‍या) आणि विश्वामित्री ते कुडाळ (6 फेर्‍या) या गाड्या असणार आहेत. 18 जुलैपासून या रेल्वेगाड्यांचे आरक्षण खुले होणार आहे. प्रवाशांना या गाड्यांची सविस्तर माहिती पश्चिम रेल्वेच्या अधिकृत रेल्वे संकेतस्थळावर मिळू शकणार आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami