संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 16 August 2022

गणेश नाईकांची डीएनए करा! महिलेची न्यायालयात मागणी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

बेलापूर – ऐरोलीचे भाजपा आमदार गणेश नाईक यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार करणाऱ्या महिलेने आता न्यायालयात धाव घेतली आहे. गणेश नाईक हे माझ्या मुलाचे वडील आहेत, परंतु ते माझा आणि मुलाचा स्वीकार करण्यास तयार नाहीत. त्यामुळे त्यांचे पालकत्व सिद्ध करण्यासाठी त्यांची डीएनए चाचणी करणे आवश्यक असून या चाचणीची परवानगी द्यावी, अशी मागणी या महिलेने बेलापूर न्यायालयात याचिकेद्वारे केली आहे.

पीडित महिलेने याचिकेत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. ‘गणेश नाईक यांनी मला लग्नाचे वचन दिले होते. मुलगा मोठा झाल्यावर तुमचा स्वीकार करेन, असेही सांगितले होते. मात्र त्यांनी एकही शब्द पाळला नाही, उलट आम्हाला त्रास दिला. नाईक यांनी माझी आणि मुलाची आतोनात छळवणूक केली. त्यांची छळवणूक करण्याची पद्धत फार विचित्र होती’, असे महिलेने म्हटले आहे. ‘माझा मुलगा आता १४ वर्षांचा झाला असून त्याच्या मागे वडिलांचे नाव नसल्यामुळे त्याची चारचौघांमध्ये व मित्रांमध्ये वावरताना कुचंबणा होते. त्यामुळे त्याला वडिलांचे नाव आणि त्यांच्या इतर मुलांप्रमाणे अधिकार मिळावेत’, असेही महिलेने याचिकेत नमूद केले आहे. दरम्यान, ऍड. लुसी मोशी या पीडित महिलेची बाजू न्यायालयात मांडणार आहेत.

दरम्यान, गणेश नाईक यांच्यासोबत गेली २७ वर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या या महिलेने रिव्हॉल्वर दाखवून जीवे मारण्याचा आणि बलात्काराचा आरोप केल्यानंतर नाईक यांच्याविरोधात सीबीडी बेलापूर आणि नेरूळ पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झाले आहेत. या दोन्ही गुह्यांमध्ये अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी नाईक यांनी ठाणे सत्र न्यायालयात धाव घेतली होती, मात्र तिथे अटकपूर्व जामीन फेटाळून लावल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात या निर्णयाला आव्हान दिले. तिथे त्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami