संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 14 August 2022

गणेश मूर्तीच्या उंचीवर
कोणतीही मर्यादा नाही

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – आज सह्याद्री अतिथीगृहात सार्वजनिक गणेशोत्सव, मोहरम, दहीहंडी उत्सवाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणेशोत्सव मंडळ, मुर्तीकरांचे प्रतिनिधी, दहीहंडी समन्वय समिती, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि संबंधित विभागांच्या सचिवांची बैठक बोलावली होती. यंदा गणेशोत्सवात गणेश मूर्तीच्या उंचीवर कोणतीही मर्यादा लावण्यात येणार नाही. गणेशोत्सव मंडळांकडून उभारण्यात येणार्‍या मंडपावर कोणताच शुल्क आकारण्यात येणार नसल्याचे एकनाथ शिंदेंनी सांगितले.
एकनाथ शिंदे म्हणाले की, गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटामुळे राज्यातील दहीहंडी, गणेशोत्सव, मोहरम यासारखे सण मोठ्या प्रमाणावर साजरे करण्यास मर्यादा आल्या होत्या. आता हे सर्व सण निर्बंधमुक्त साजरे करता येणार आहेत. या सणांबाबत हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचे जे आदेश आहेत त्याचे पालन मात्र करणे गरजेचे आहे. गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी राज्यभरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यात यावेत, गणेशोत्सव मंडळांना कोणतेही नोंदणी शुल्क आकारण्यात येणार नाही. तसेच मंडळांना हमीपत्र देखील न घेण्याचे आणि सरसकट परवानग्या देण्याचे निर्देश देण्यात आले आहे. गणेशोत्सव मंडळांना एक खिडकी योजनेतूनच सर्व प्रकारच्या परवानग्या मिळातील. गणेशोत्सवासाठी गावी जाणार्‍या चाकरमान्यांना टोल फ्री करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मूर्तीच्या उंचीवरची मर्यादा उठवली आहे. मुंबईत मूर्तीकारांसाठी मूर्ती शाळांसाठी जागा निश्‍चित करण्याचे आदेश दिले आहेत. मूर्तीकारांसाठी असलेल्या काही जाचक अटी आणि शर्ती शिथिल केल्या आहेत. पीओपीच्या मूर्तींबाबत एक तांत्रिक समिती नियुक्त केली जाणार असून, त्यामध्ये एमपीसीबी, निरी, आयआयटी, एनसीएल आदी संस्थांचे तज्ज्ञ प्रतिनिधी असतील. ही समिती पर्यावरणपूरक मार्ग काढेल, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami