मुंबई – ज्यांच्यावर पक्षाची धुरा सोपवली त्यांनीच पाठीत वार केला त्यामुळे अशा गद्यराना माफी नाही . असा इशाराच उद्धव ठाकरे यांनी सेनेच्या बंडखोरांना दिला आहे . तसेच काल रिक्षा सुसाट होती तिला ब्रेकचं नव्हता. अशा शब्दत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. त्याला ताबडतोब प्रत्युत्तर देताना शिंदे यांनी सांगितले कि रिक्षा पुढे मर्सिडीजच्या वेग फिका पडला. कारण नवे सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. फडणवीस यांनीही मुख्यमंत्र्यांच्या टीकेचा समाचार घेतला आहे .
आज शिवसेनेच्या महिला आघाडीच्या बैठकीत बोलताना उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा आपल्या सोबत असलेल्याना भावनिक साद घातली. ते म्हणाले एका बाजूला गद्दाराच्या चेहऱ्यावरचे विकृत हसू, तर दुसऱ्या बाजूला माझ्या निष्ठावान भगिनींच्या डोळ्यातले अश्रू यांच्या मध्ये मी उभा आहे. आणि यातून मला मार्ग काढायचा आहे. पण मी मार्ग काढणारच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले कि ज्यांच्याशी आम्ही २०-३० वर्ष लढलो .ज्यांच्यावर विश्वास ठेऊ नका असे लोक सांगत होते ते आज आमच्या सोबत आहेत. पण ज्यांच्यावर विश्वास ठेऊन पक्षाची धुरा त्यांच्याकडे सोपवली त्यांनीच पाठीत खंजीर खुपसला . काळ रिक्षाचा वेग सुसाट होता रिक्षाला ब्रेकचं नव्हता .तसेच मुख्यमंत्र्यांकडून फडणवीसांनी मायिक काढून घेतला . त्यामुळे आणखी काय काय कडून घेतील याचा नेम नाही असा फडणवीसना सुद्धा टोला लगावला. दरम्यान ठाकरेंच्या या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले कि रिक्षा समोर मर्सिडीजचा वेग फिका पडला आहे. कारण आमचे सरकार सर्वसामान्यांचे सरकार आहे. आता ठाकरे आणि सत्ताधारी यांच्यातील हे हल्ले प्रतिहल्ले सुरूच राहणार आहेत