संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 09 August 2022

गाईच्या शेणानंतर भूपेश सरकार आता गोमूत्रचीही खरेदी करणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

रायपूर : छत्तीसगड सरकारकडून राज्यात अनेक योजना राबवल्या जात असताना, छत्तीसगडमधील पशुपालकांना उत्पन्नाचे आणखी एक साधन मिळणार आहे. कारण आता राज्य सरकार गाईच्या शेणासोबतच गोमुत्राचीही खरेदी करणार आहे. या गोमुत्राचा वापर कीड नियंत्रक उत्पादने बनवण्यासाठी करण्यात येणार आहे. सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना किमान दरात खते, कीड नियंत्रक उत्पादने उपलब्ध करून देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या प्रमुख उपस्थितीत लवकरच या योजनेची अंमलबजावणी सुरु केली जाणार आहे.

पशुपालकांना गोमुत्रासाठी प्रति लिटर किमान ४ रुपये देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आल्याची माहिती समोर आली आहे. दुर्ग जिल्ह्यातील खरसा या गावात होणाऱ्या ‘हरेली’ या स्थानिक उत्सवापासून या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात रायपूर जिल्ह्यातील गोशाळांमधून गोमुत्राची सरकारी खरेदी सुरु होणार आहे. दरम्यान, छत्तीसगड सरकारकडून राज्यात गोधन न्याय योजना राबवण्यात येत असून, सरकार पशुपालकांकडून शेणाची खरेदी करते. त्यामुळे पशुपालकांना आर्थिक मदत होते. या शेणाचा वापर सेंद्रिय खतांच्या निर्मितीसाठी केला जातो. हेच खत शेतकरी सेंद्रिय पद्धतीने लागवड करताना वापरतात. गोधन न्याय योजनेअंतर्गत पशुपालकांना शेणासाठी २ रुपये किलो असा दर दिला जातो.सरकारच्या या योजनेला पशुपालकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे सरकारने आता शेणासोबतच गोमूत्राचीही खरेदी करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सरकारी सूत्रांकडून समजते. ची निर्मिती केलेली आहे. त्यापासून कंपोस्ट खतांच्या निर्मितीची प्रक्रिया सुरु असल्याचेही सूत्रांनी नमूद केले

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami