नाशिक- योग दिनानिमित्त मंगळवार 21 जूनला भाजपचे माजी अध्यक्ष आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा नाशिकच्या त्र्यंबकेश्वर दौर्यावर येणार आहेत. अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गच्या सदस्यांनी एप्रिलमध्ये दिल्लीला जाऊन गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. सेवामार्गच्या वतीने गुुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली देशविदेशातील सुमारे 10 हजार केंद्राच्या माध्यमातून अध्यात्मिक, सामाजिक आणि राष्ट्रसेवेचे कार्य पूर्ण निष्ठेने आणि सक्षमतेने केले जात आहे. या सदस्यांनी गृहमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्या कामांची माहिती दिली आणि समर्थ गुरुपीठात येण्याची विनंती केली. अमित शहा यांनी सेवामार्गाचे हे निमंत्रण स्वीकारले. आता तेच आश्वासन पूर्ण करण्यासाठी अमित शहा आंतराराष्ट्रीय योग दिनाच्या दिवशी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर समर्थ गुरुपीठाला भेट देणार आहेत. त्यांच्यासोबत माजी मुख्यमंत्री आणि विधानसेभेचे विरोधी पक्ष नेते देेवेंद्र फडणवीस आणि अन्य भाजपातील आघाडीचे नेते उपस्थितीत राहणार आहे.