दिल्ली – केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची मुलगी गोव्यात अवैध परवान्यासह बार चालवत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. इराणींनी काँग्रेसचा हा आरोप फेटाळून लावला असून काँग्रेस नेत्यांविरोधात इराणी यांच्या वकिलांनी कायदेशीर नोटीस पाठविली आहे. काँग्रेस पक्ष, जयराम रमेश, पवन खेरा आणि नेटा डिसूझा यांना ही नोटीस पाठविण्यात आली आहे. काँग्रेसचे आरोप निराधार आहेत. स्मृती इराणी यांनी कॉंग्रेस नेत्यांना लेखी बिनशर्त माफी मागावी आणि तत्काळ प्रभावाने आरोप मागे घेण्यात येण्याची मागणी केली आहे.
स्मृती इराणी यांचा आसगाव बार्देश येथील बेकायदेशीर कॅफे आणि बार त्वरित बंद करण्यासाठी युवक काँग्रेसच्या सदस्यांनी कुलूप आणि चावी पोलिसांकडे सुपूर्द केली. याचबरोबर स्मृती इराणी यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी यावेळी युवा कॉंग्रेसच्या सदस्यांकडून करण्यात आली आहे. एकंदरीत परिस्थितीमुळे स्मृती इराणी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दरम्यान, स्मृती इराणी यांची मुलगी झोईश हिचा काहीही संबंध नाही. विरोधकांनी केलेले सर्व आरोप निराधार असून आरोप राजकीय सूडबुद्धीने केले असल्याचे स्पष्टीकरण झोईश यांचे वकिल किरत नागरा यांनी दिले.माझी १८ वर्षांची मुलगी महाविद्यालयीन विद्यार्थिनी असून ती बार चालवत नाही. काँग्रेसने माझ्या मुलीचे चारित्र्यहनन व माझी प्रतिमा मलीन करण्यासाठी हे आरोप केलेत,” अशी टीका स्मृती इराणी यांनी केली.