संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 12 August 2022

गोव्यातील प्रसिद्ध मल्लिकार्जुन मंदिरात महारुद्राच्या साक्षीने श्रावण मासारंभ

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पणजी- दक्षिण गोव्यातील काणकोण तालुक्यातील श्रीस्थळ या गावात मल्लिकार्जुन मंदिर आहे. हे मंदिर सुमारे १६ व्या शतकात बांधण्यात आले असून या मंदिराचा जीर्णोद्धार सन १७७८ मध्ये करण्यात आला होता. या मंदिरात प्रति वर्षाप्रमाणे यंदा श्रावण महिन्यात विशेष धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने जलाभिषेक, रुद्राभिषेक आणि विविध धार्मिक ,सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश आहे.
गोव्यासह महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातील शिवभक्त आवर्जुन या ठिकाणी श्रावण महिन्यात दर्शनासाठी येत असतात. स्थापत्यकलेचा अप्रतिम नमुना म्हणूनही या मंदिराकडे पाहिले जाते.आज शुक्रवारपासून या मंदिरात महारुद्राने प्रारंभ करण्यात आला.या श्रावण उत्सवाची समाप्ती ४ ऑगस्टला होणार आहे.प्रत्येक सोमवारी या मंदिरात महाअभिषेक, कीर्तनआणि श्रीची मिरवणूक पार पडणार आहे.श्रावणातील पहिला सोमवार १ ऑगस्ट रोजी येत असून यादिवशी हा दिवस महाजनांमार्फत साजरा केला जाईल.संध्याकाळी ६.३० वाजता हभप मंदार परशुराम गोखले यांचे कीर्तन होईल.तर दुसऱ्या सोमवार राजे सैन्देकर आणि नगर्सेकर महाजनांच्यावतीने साजरा होईल.तर तिसरा आणि चौथा सोमवार भैरेली कुटुंबीय आणि मोरवर्डकर वैष्णव समाजामार्फत साजरे होतील.तर गुरुवारी ११ ऑगस्ट रोजी नारळी पोर्णिमा,रक्षाबंधन,गुरुवार १८ ऑगस्ट रोजी गोकुळाष्टमी तर मंगळवार २३ ऑगस्ट रोजी देवाची नवी आदी कार्यक्रम देवस्थानतर्फे पार पडतील. तरी या श्रावण मास उत्सवासाठी सर्व महाजन कुटुंबीयांनी सहकार्य करावे असे आवाहन मंदिर देवस्थान मार्फत करण्यात आले आहे

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami