संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 23 May 2022

गोव्यात मोफत वीज, पाणी आणि शिक्षण, बेरोजगारांना ३००० रुपये; अरविंद केजरीवालांचे गोवेकरांसाठी व्हिजन

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email
Print

पणजी – गोवा विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाल्यानंतर आता राजकारण तापत असल्याचेच दिसत आहे. घोषणांची आतिषबाजी ऐकायला येते आहे. अशावेळी गोव्यात निवडणुकीच्या हालचाली तीव्र होत असताना, एकीकडे भाजप आपल्या उमेदवारांची अंतिम यादी तयार करण्यात व्यस्त आहे. तर आम आदमी पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी गोव्यातील जनतेसाठी अनेक घोषणा केल्या आहेत.

अरविंद केजरीवाल रविवारी गोव्यात प्रसार माध्यमांशी बोलत होते. गोव्यात आम आदमी पक्षाचे सरकार आल्यास उत्तम आरोग्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात, गावात मोहल्ला दवाखाने सुरू केली जातील तसेच राज्यातील सरकारी शाळांमध्ये वीज, पाणी आणि शिक्षण पूर्णपणे मोफत दिले जाईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. गोव्यात यावेळी आम आदमी पक्ष जोरदारपणे मैदानात उतरला आहे. काल केजरीवाल यांनी गोव्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी गोव्यासाठी आपले व्हिजन मांडले.

आपचे सरकार आल्यास बेरोजगारांना महिना ३ हजार मिळणार. १८ वर्षांवरील महिलांना १ हजार देणार असल्याचे आश्वासनं देखील त्यांनी दिले. त्याचबरोबर राज्याचे पर्यटन क्षेत्र आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आधारे ते उन्नत केले जाणार आहे. राज्यातील रस्त्यांची स्थिती सुधारली जाईल. शेतकरी वर्गाशी बोलून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले जातील, असे ते म्हणाले. तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला जाईल, तसेच ज्यांना रोजगार मिळू शकणार नाही, त्यांना दरमहा ३ हजार रुपयांची मदत दिली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच आपल्या घोषणानंतर त्यांनी तोडफोडीचे राजकारण आम्ही करत नाही, असे म्हणत आम्ही टीएमसीसोबत जाणार नाही मात्र उत्पल पर्रीकर आपमध्ये आल्यास त्यांचे स्वागत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मनोहर पर्रीकर यांच्याबदल आदर आहे, असेही केजरीवाल म्हणाले. संजय राऊत यांनी आपले पाहावे, असा टोलाही केजरीवाल यांनी लगावला. गोवा विधानसभेच्या ४० जागांसाठी १४ फेब्रुवारी २०२२ रोजी मतदान होईल तर १०मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami