संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 23 May 2022

गोव्यात राष्ट्रवादी स्वबळावर लढणार; तर उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षासोबत

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email
Print

गोंदिया – राष्ट्रवादी काँग्रेस उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षासोबत, तर मणिपूरमध्ये काँग्रेसशी युती करून विधानसभा निवडणूक लढणार आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने गोव्यासाठी वेगळा निर्णय घेतला आहे. गोवा विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढवणार असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले आहे.

खासदार पटेल यांनी उत्तर प्रदेश आणि मणिपूर निवडणुकीसंदर्भातील राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका सविस्तर स्पष्ट केली आहे. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षासोबत आघाडी केली असून पहिल्या टप्प्यात एक जागा लढवणार असून पुढच्या टप्प्यातील माहिती लवकरच कळेल, असे पटेल म्हणाले. तसेच गोवा विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे सांगितल्याने आता काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेससोबत युती करण्याच्या आशा मावळल्याचे दिसून येत आहे. गोव्यात राष्ट्रवादी काँग्रेस कोणत्याही पक्षाशी युती न करता स्वबळावर लढणार आहे. गोंदिया जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक प्रचारादरम्यान प्रसार माध्यमांसमोर त्यांनी ही घोषणा केली आहे. गोव्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस तसेच तृणमूल काँग्रेसमध्ये युती करीत लढणार असल्याचे चिन्हे दिसत नाहीत. आम्ही आमच्या पद्धतीने लढायची तयारी केली आहे. तर, काही ठिकाणी शिवसेनेसह समविचारी पक्षासोबत युती करून लढणार आहोत. उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समाजवादी पक्षासोबत युती करून लढत आहे. पहिल्या टप्प्यात राष्ट्रवादी काँग्रेस एक जागा लढवत असून पुढील टप्प्यात आणखी जागांबाबत माहिती समोर येईल, असे प्रफुल्ल पटेल म्हणाले. त्याचप्रमाणे मणिपूर विधानसभेचीदेखील निवडणूक जाहीर झाली असून तिथे दोन टप्प्यात निवडणूक पार पडणार आहे. मणिपूरमध्ये आम्ही काँग्रेससोबत युती करून लढणार आहोत. मणिपूरमध्ये राष्ट्रवादीला ५ जागा मिळतील, अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी यावेळी दिली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami