संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 20 August 2022

‘घरोघरी तिरंगा’ अभियानासाठी पालिकेतर्फे झेंड्यांचे फ्री वाटप

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई :भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षनिमित्त केंद्राकडून ‘हर घर तिरंगा’ अभियान राबवले जात आहे. यासाठी पालिका ७ कोटींचा खर्च करून आजपासून मोफत झेंडे वाटप करणार आहे. देशभरात १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ अभियान राबवले जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त, केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार मुंबईत १३ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत ‘घरोघरी तिरंगा’ अर्थात ‘हर घर तिरंगा’ अभियान राबवले जात आहे. त्यासाठी पालिकेतर्फे ५० लाख झेंड्यांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. या अभियानाच्या अंतर्गत झोपडपट्टी, चाळी, वसाहती, मध्यम वर्गीय सोसायटी, उंच इमारतींसह पालिका, खासगी व सरकारी कार्यालये आदी ठिकाणी भारतीय तिरंगा डौलाने फडकविण्यासाठी पालिकेतर्फे ५० लाख झेंड्यांचे मोफत वाटप मंगळवारपासून करण्यात येणार आहे. यासंदर्भातील माहिती पालिका प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार हे अभियान राबविण्यात येणार आहे. त्यासाठी विविध क्षेत्रांमधील सामाजिक संस्थां, बचत गट, स्वयंसहाय्यता गट, स्वयंसेवक यांचे योगदान घेण्यात येणार आहे. भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, केंद्र शासनाच्या वतीने आझादी का अमृत महोत्सव’ राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून हर घर तिरंगा’ अभियान राबवले जात आहे. पालिका ७ कोटींचा खर्च करून मोफत झेंडे वाटप करणार आहे. त्याचप्रमाणे १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान मरीन ड्राईव्ह येथे ‘लेझर शो’ देखील होणार आहे. या कालावधीत प्रत्येकाने आपल्या निवासस्थानाच्या गॅलरीत,खिडकीत, दरवाजावर हा झेंडा लावायचा आहे, असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami