संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 19 August 2022

चीनच्या वुहानमध्ये पुन्हा कोरोना! मेट्रो, बस, चित्रपटगृहे, कॅफे बंद

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

बीजिंग- चीनच्या वुहानमध्ये पुन्हा एकदा कोरोना सक्रिय झाला आहे.चीनच्या वुहानमध्ये परत एकदा कोरोनाचे रूग्ण दिसू लागल्याने अनेक देशांनी मोठा धसका घेतला आहे. वुहानमधूनच संपूर्ण जगात कोरोना पसरला होता. आता पुन्हा कोरोनाचे रुग्ण सापडत असल्याने तेथील बार,चित्रपट गृहे आणि कॅफे सर्व बंद करण्यात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जियांगक्सियामध्ये कोरोनाचे चार रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर या जिल्ह्यातील मेट्रो आणि बस सेवा तीन दिवसांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे

कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे बार,चित्रपटगृहे, बाजारपेठ,रेस्टॉरंट्स आणि इंटरनेट कॅफे पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. जियांगक्सियामध्ये मोठ्या कार्यक्रमांवरही बंदी घालण्यात आली आहे. सर्व धार्मिक स्थळे बंद करण्यात आली असून धार्मिक कार्यक्रमांवरही बंदी घालण्यात आली आहे. यासोबतच शैक्षणिक संस्थाही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील काही दिवस आता जियांगक्सियामधील शाळा आणि महाविद्यालयेही बंदच राहणार आहेत. लोकांना खूप महत्वाचे काम असल्याशिवाय शहरही सोडून नका,असे आवाहन करण्यात आले आहे. तेथील रहिवाशांना घरे सोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. २०२० मध्ये चीनमधील वुहान येथे जगातील पहिले लॉकडाउन लावण्यात आले. त्यानंतर कोरोनाच्या रूग्णांची संख्या झपाट्याने वाढली आणि संपूर्ण जगातच कोरोना रोखण्यासाठी लॉकडाउन लावले. दरम्यान,चीनच्या अर्थव्यवस्थेमध्ये दुसर्‍या तिमाहीत प्रत्येक वर्षाला ०.४ टक्के इतकीच वाढ झाली आहे. तर आशियाई विकास बॅंकेने चीनसाठी २०२२ चा विकासदर एप्रिलमध्ये ५ टक्क्यांहून कमी करत ४ टक्क्यांवर आणला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami