संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 12 August 2022

जळगावच्या महिला महापौरांना धमक्या! शिंदे गटात या, अन्यथा शहर विकास थांबवू

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

जळगाव – शिवसेनेतून बंडखोरी करत बाहेर पडलेल्या शिंदे गटाने राज्याची सत्ता भाजपच्या मदतीने काबीज केली असली तरी पूर्णपणे शिवसेना पक्ष ताब्यात घेण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी साम, दाम,दंड नीती वापरली जात आहे. कारण जळगावच्या महिला महिला महापौर जयश्री महाजन यांनीच तशा पद्धतीचा गंभीर आरोप केला आहे. शिंदे गटात येण्यासाठी मला धमक्या दिल्या जात असून शिंदे गटात आला नाही तर शहराचा विकास थांबवू असा मेसेजद्वारे मला विरोधी गटाकडून इशारा दिला असल्याचे महापौरांनी म्हटले आहे.

त्यामुळे हे प्रकरण आता जास्त तापण्याची शक्यता आहे,तसेच शिंदे गटाचीही यावर लवकरच प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे. जळगावच्या महापौर जयश्री महाजन यांनी म्हटले आहे की, शिवसेना सोडून शिंदे गटात येण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला जात आहे. तसेच गटात आला नाही तर आम्ही शहराचा विकास थांबवून तुम्हाला आम्ही अडचणी निर्माण करू अशा प्रकारचे मेसेज गटाकडून मेसेजद्वारे पाठवून धमकावले जात आहे.मात्र अशा मेसेजद्वारे होत असलेला दबाव आणि धमक्यांना बळी न पडता जळगाव शहराची निष्ठा व नागरिकांचा विश्वास हा महत्त्वाचा असल्याने या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नसल्याचे महापौर जयश्री महाजन यांनी स्पष्ट केले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami