संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 18 August 2022

जिओटॅग बसवलेलेे
‘प्रथमा’ कासव बेपता

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

रत्नागिरी- 2700 किमी इतका समुद्र प्रवास करणारे एक दुर्मिळ प्रजातीचे कासव बेपता झाले. या कासवाला जिओटॅग बसवण्यात आला होता. त्या ट्रान्समीटरवरून सिग्नल येणे बंद झाले आहे. या कासवाचे नाव प्रथमा असे आहे. ती अ‍ॅलिव्ह रिडले या समुद्री कासव प्रजातीची मादी आहे. ऑलिव्ह रिडले कासवाच्या प्रजननाच्या संवर्धनासाठी ओळखल्या जाणार्‍या रत्नागिरी जिल्ह्यातील वेळास इथल्या किनार्‍यावरून ती 25 जानेवारी 2022 रोजी समुद्रात शिरली होती. तिने तिथून समुद्र मार्गाने गुजरात गाठले. गुजरातच्या दिशेने वळण्यापूर्वी तिने दाभोळ येथील खाडीत काही काळ मुक्काम केला होता. दिव येथील समुद्र किनार्‍यावर काही काळ घालवून ती पुन्हा परत फिरली आणि महाराष्ट्रजवळील समुद्रात आली. त्यानंतर तिचा संपर्क तुटला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami