संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 19 August 2022

जुहू अत्याचार प्रकरण गुडाप्पाला फाशीची शिक्षा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- मुंबईतील दिंडोशी न्यायालयाने गुडाप्पा चिन्नाटंबी देवेंद्र याला अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्याने एप्रिल 2019 मध्ये जुहू परिसरातील एका 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिचा मृतदेह गटारात फेकला होता. त्यानंतर दिंडोशी न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली आहे.

एप्रिल 2019 मध्ये 9 वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार आणि हत्या करण्यात आली होती. त्यानंतर गुडाप्पा चिन्नाटंबी देवेंद्र या आरोपीला दिंडोशी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. पण यानंतर आरोपी उच्च न्यायालयात अपील करू शकणार आहे. याआधी दोन दिवसांपूर्वी दिंडोशी न्यायालयाने साकीनाका बलात्कार आणि हत्येप्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली होती.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami