संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 19 August 2022

जुहू चौपाटीवर विषारी ब्ल्यू बॉटल जेलीफिश! अनवाणी न फिरण्याचे पालिकेचे आवाहन

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- मागील काही दिवसांपासून जुहू समुद्रकिनाऱ्यावर विषारी समजले जाणारे ब्ल्यू बॉटल नावाचे जेलीफिश दिसू लागल्याने याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना धोका निर्माण झाला आहे.त्यामुळे या जुहू चौपाटीवर फिरण्यास येणाऱ्या नागरिकांनी सावधानता बाळगत अनवाणी म्हणजेच पायात चप्पल किंवा बूट न घालता फिरू नये असे आवाहन मुंबई महापालिका प्रशासनाने केले आहे.दरम्यान, या जेलीफिशच्या भीतीमुळे या समुद्रकिनाऱ्यावर जीवरक्षकांची नेमणूक केली जात आहे.

मुंबईतील समुद्रकिनाऱ्यावर ठराविकअशा तीन हंगामात तीन प्रकारचे जेलीफिश आढळून येत असतात.पावसाळ्यापूर्वी ब्ल्यू बटन,ऐन पावसाळ्यात ब्ल्यू बॉटल आणि पावसाळा संपत आल्यावर बॉक्स नावाचे जेलीफिश मोठ्या संख्येने नजरेस पडतात.या सर्वात जास्त त्रासदायक वाटणारे जेलीफिश हे ब्ल्यू बॉटल आहे.जेलीफिशचा आकार फुग्यासारखा असून रंग निळा असतो.जेलीफिशला स्पर्श झाल्यास अंगावर लाल चट्टे,खाज सुटणे,त्या भागावर सूज येणे,आदि लक्षणे दिसून येतात.कोणतेही जेलीफिश शरीराला चिकटले तर घाबरून जाता ते काढून खारट पाण्याने किंवा पाण्याने तो भाग धुवून बर्फाने शेकावा.तसेच अशा समुद्र किनाऱ्यावर तैनात असलेल्या जीवरक्षकाकडे असलेले व्हाईट व्हीनेगर कापसावर घेऊन ते लावावे.महत्वाचे म्हणजे मुळात पर्यटकांनी चापल न घालता अशा ठिकाणी फिरू नये अशा सूचना पालिका प्रशासकातर्फे करण्यात आल्या आहे

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami