लंडन – जेम्स बाँड चित्रपटांसाठी थीम संगीत लिहिण्यासाठी प्रसिद्ध असलेले ब्रिटीश संगीतकार मॉन्टी नॉर्मन यांचे काल सोमवारी वयाच्या ९४व्या वर्षी निधन झाले. मॉन्टी नॉर्मन यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
नॉर्मन हे साेळाव्या वर्षांपासून गिटार वादन करीत असत. त्यांनी ‘सॉंगबुक’ आणि ‘पॉपी अँड मेक मी एन ऑफर’ आणि क्लिफ रिचर्डसारख्या पॉप स्टार्ससह संगीत आणि चित्रपटांसाठी गाणी लिहिण्यापूर्वी मोठ्या बँडसह आपल्या गायन कारकीर्दीची सुरुवात केली. सन १९६२मध्ये नाॅर्मनने जेम्स बाँडचा पहिला चित्रपट ‘डॉ. नो’मध्ये केलेले काम सर्वाधिक लाेकप्रिय ठरले.
नाॅर्मन यांच्या निधनानंतर जेम्स बाॅण्ड चित्रपटाच्या चाहत्यांनी नाॅर्मन यांना सोशल मीडियावरून श्रद्धांजली वाहिली आहे. अनेकांनी बाँड चित्रपटांचे छायाचित्र, संगीत पाेस्ट केले आहे. जेम्स बाँड थीमचे संगीतकार मॉन्टी नॉर्मन यांचे निधन झाले असले तरी त्यांचा वारसा आणि चंदेरी दुनियेत त्यांनी दिलेली देणगी सदैव स्मरणात राहील.