संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 14 August 2022

जो गद्दारांची गाडी फोडेल त्याचा
उद्धवजींच्या हस्ते बहुमान करणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

हिंगोली – उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ असलेल्या शिवसेना नेत्यांकडून शिंदे गटातील आमदारांवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. यातच आता हिंगोलीतील शिवसेना संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. गद्दार आमदारांची जो कुणी पहिली गाडी फोडेल त्याचा पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या हस्ते बहुमान करणार, असे विधान थोरात यांनी केले आहे.
आज हिंगोली शहरातील महावीर भवनमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्ता आणि पदाधिकार्‍यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलताना संपर्कप्रमुख बबनराव थोरात म्हणाले की, तुम्हाला आता गावागावात उभे राहावे लागेल. गद्दारांना विचारावे लागेल की ज्या देवमाणसामुळे तुम्ही आमदार, खासदार झालात, त्याच्याच पाठीत खंजीर खुपसलात. तुम्हाला आता आम्ही गावात येऊ देणार नाही. जेजे जिल्हा प्रमुखपदासाठी इच्छुक आहेत त्या सर्वांना माझे आवाहन आहे ज्यांच्या कार्यक्षेत्रात या गद्दारांच्या गाड्या येतील आणि पहिली गाडी जो फोडेल त्याचा बहुमान उद्धव ठाकरेंच्या हस्ते मातोश्रीवर केला जाईल.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami