संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 16 August 2022

ज्ञानवापीची नवी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – बहुचर्चित ज्ञानवापी मशिदीच्या विहिरीत आढळलेल्या शिवलिंगाची पूजा आणि कार्बन डेटिंगच्या परवानगीसाठीच्या नव्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज नकार देत याचिका फेटाळली. आता खटला प्रलंबित असल्याने त्यावर सुनावणी घेता येणार नाही, असे न्यायालयाने याचिकाकर्त्यांना सांगितले.

तसेच सर्वोच्च न्यायालयाने वकील हरिशंकर जैन यांना सांगितले की, ‘तुम्ही एक हुशार वकील आहात, तुम्ही याचिकेत काय मागणी करत आहात, तुम्ही दाव्यावरील युक्तिवादाच्या सुनावणीदरम्यान मागणी करू शकता. कलम ३२ अंतर्गत तुम्ही मागणी करू शकत नाही. याचिकाकर्ते ट्रायल कोर्टात हा मुद्दा मांडू शकतात. ट्रायल कोर्ट हे प्रकरण कायम ठेवण्यायोग्य असल्यास त्याची सुनावणी सुरू ठेवेल’, असे न्यायालयाने म्हटले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami