संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 20 August 2022

ज्ञानवापी मशिद खटल्याची २२ जुलैला हायकोर्टात सुनावणी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

वाराणसी – वाराणसी काशी विश्वनाथ मंदिर- ज्ञानवापी मशिद प्रकरणाची सुनावणी अलाहाबाद उच्च न्यायालयाने पुढे ढकलली आहे. त्यामुळे यावर २२ जुलैला सुनावणी होणार आहे. प्रतिवादीचे वकील विजय शंकर रस्तोगी यांनी केलेल्या विनंतीवरून न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलली.

वाराणसीच्या अंजुमन इंताजामिया मशिदीने १९९१ मध्ये जिल्हा न्यायालयात दाखल केलेल्या मूळ खटल्याच्या पुनर्संचियतेला आव्हान देणारी याचिका दाखल केली आहे. मशिदीच्या ठिकाणी प्राचिन मंदिर होते. मशिद मंदिराचा भाग आहे, असा दावा याचिकेत केला आहे. प्रतिवादीचे वकील विजय शंकर रस्तोगी यांनी याची सुनावणी पुढे ढकलावी, अशी विनंती हायकोर्टाला केली होती. त्यानुसार न्यायालयाने यावर २२ जुलैला दुपारी २ वाजता पुढील सुनावणी ठेवली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami