वाराणसी – उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील शृंगार गौरी येथील नियमित दर्शन, पूजन, वाद आणि ज्ञानव्यापी प्रकरणात मुस्लीम समाजाच्या अंजुमन इंतजामिया कमिटीचे वकील अभयनाथ यादव यांचे रात्री उशिरा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. काल रविवारी सायंकाळी यादव यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तिथे त्यांना मृत घोषित केले. त्यांचे सहकारी वकील नित्यानंद राय यांनी सांगितले की, काल रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास त्यांना तीव्र स्वरूपाचा हृदयविकाराचा झटका आला. त्यांना आधी जवळच्या त्रिमूर्ती आणि नंतर शिवम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. तिथेच उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. शृंगार गौरी आणि ज्ञानव्यापीच्या खटल्याबाबत सर्व पक्षांनी शाश्वततेच्या मुद्यावर पूर्ण चर्चा केली असून आता येत्या 4 ऑगस्टला मुस्लीम बाजूने उत्तर द्यायचे होत. मात्र मुस्लीम बाजूचे वकील अभयनाथ यादव यांनी महत्त्वाची भूमिका मांडण्याआधी त्यांचा मृत्यू झाला. ज्ञानव्यापी खटल्यात हरिशंकर जैन आणि विष्णू शंकर जैन हे हिंदूंची बाजू मांडत आहेत.