संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 09 August 2022

ज्येष्ठ कवयित्री, लेखिका उर्मिला कराड यांचे निधन

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पुणे – ज्येष्ठ कवयित्री, लेखिका उर्मिला कराड यांचे बुधवारी आकस्मित निधन झाले. लोणी काळभोर येथील विश्वराज रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या ७९ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, पुतणे, मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

उर्मिला कराड या मूळ नाशिकच्या. लहानपणापासूनच त्यांना काव्य लेखनाची आवड होती. माहेर, सासर दोन्ही घराणी संपूर्ण वारकरी संप्रदायाची असल्याने त्यांचा संत साहित्यावर गाढा अभ्यास होता. गेली अनेक वर्ष त्या पंढरपूरची पायी वारी करत असत. ह.भ.प. संतु राजाराम पाटील हे त्यांचे वडील होते. तर, पुण्याच्या माईर्स एमआयटी शिक्षण संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या त्या पत्नी होत्या.

उर्मिला कराड यांचे शिक्षण नाशिकमधील एच. पी. टी. महाविद्यालयातून झाले. १९६४ साली त्यांनी मराठी विषयात बी. ए. (ऑनर्स) ही पदवी प्रथम क्रमांकाने मिळविली. ‘समीर’ हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह १९८९ मध्ये प्रकाशित झाला. पुढे ‘अरे संसार संसार’, ‘अनुभूती’, ‘माझी माय दुधावरची साय’ यासह अनेक लोकप्रिय कवितासंग्रह लिहिले. तसेच विविध वृत्तपत्रांमधून त्यांनी अनेक विषयांवर विपुल लेखन केले. दरम्यान, एमआयटी संस्थेच्या जडणघडणीत प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांना उर्मिला कराड यांनी मोलाची साथ दिली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami