रांची – झारखंडच्या गिरिडीहमध्ये बोट उलटल्यानंतर 8 जण बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली. धनवार ब्लॉकमधील गोरहंद आणि कोडरमाच्या मार्कच्या सीमेवर असलेल्या पंचखारो धरणात आज ही घटना घडली. स्थानिक प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून त्यांचा शोध घेतला जात आहे. या बोटीतून 10 जण जात होते.
धनवार ब्लॉकमधील गोरहंद आणि कोडरमाच्या सीमेवर असलेल्या पंचखारो धरणात एका छोट्या बोटीतून 10 जण प्रवास करत होते. प्रवासादरम्यान बोट उलटली. त्यानंतर यातील दोनजण पोहून बाहेर आले, तर 8 जण धरणात बुडाले. या घटनेची माहिती मिळताच धरणाजवळ नागरिकांची गर्दी झाली. घटनास्थळी प्रशासनाचे पथक बेपत्ता लोकांचा शोध घेत आहे. बुडालेले सर्वजण धन्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी आहेत. पोलीस ठाण्याचे प्रभारी नागेंद्र कुमार घटनास्थळी पोहोचले आहेत. बेपत्ता लोकांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.