झारखंडमध्ये 7 मुलींचा खड्ड्यात बुडून मृत्यू

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp
Share on telegram
Telegram
Share on email
Email
Share on print
Print

लातेहार- झारखंडच्या लातेहार जिल्ह्यातील मननडीह गावात करमा पूजेनंतर करम डाली विसर्जन करण्यासाठी गेलेल्या 7 मुलींचा खड्ड्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. या घटनेनंतर संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. मृतांमध्ये तीन जण सख्ख्या बहिणी होत्या.

रेखा कुमारी (18), लक्ष्मी कुमारी (8), रीना कुमारी (11), मीना कुमारी (8), पिंकी कुमारी (15 ), सुषमा कुमारी (7), सुनीता कुमारी (17) अशी मृत मुलींची नावे आहेत. यासर्व मुली मननडीह टोला गावातील रहिवाशी होत्या.
शुक्रवारी रात्री गावात करमा पूजा संपल्यानंतर शनिवारी करम डाली विसर्जित करण्यासाठी या मुली तोरी-बाळूमठ-शिवपूर रेल्वेमार्गाच्या बांधकामासाठी खोदलेल्या खोल खड्ड्यावर गेल्या होत्या. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांना पाण्यात बुडू लागल्या. त्यानंतर महिलांनी आरडाओरड केल्याने जवळपासच्या काही लोकांनी तलावात उडी घेऊन मुलींना बाहरे काढले. मात्र तीन मुलींचा जागेवरच मृत्यू झाला तर नातेवाईकांनी चार मुलींना रुग्णालयात नेले, मात्र येथे चारही मुलींना डॉक्टरांनी मृत घोषित केले. मुलींच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाचे रडून रडून हाल झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच बालूमाथ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. दरम्यान, मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सात मुलींचा मृत्यू झाल्याने दुःख व्यक्त केले आहे. परमेश्वराने त्यांच्या कुटुंबांना हे दुःख सहन करण्याची शक्ती द्यावी, अशी प्रार्थना हेमंत सोरेन यांनी केली.

Close Bitnami banner
Bitnami