संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 15 August 2022

झारखंड सरकारची मोठी घोषणा! घराजवळ रोपे लावणाऱ्यांना मोफत वीज

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

रांची – पर्यावरणाचे रक्षक करण्यासाठी झारखंडच्या हेमंत सोरेन सरकारने मोठी घोषणा केली आहे. आता शहरी भागात राहणाऱ्या लोकांना घर किंवा कॅम्पसमध्ये रोपे लावण्यासाठी वीज बिलात सूट मिळणार आहे.रांची येथील वन महोत्सवाला संबोधित करताना मुख्यमंत्री सोरेन म्हणाले, त्यांच्या घराच्या परिसरात रोपे लावणाऱ्या कुटुंबांना प्रत्येक रोपासाठी पाच मिनिटे मोफत वीज दिली जाईल. मात्र,ही झाडे फलदायी व सावली देणारी असावी, तरच योजनेचा लाभ मिळेल.

निसर्गाशी छेडछाड करत, आपण ज्या प्रकारे विकासाच्या पायऱ्या चढत आहोत, त्यामुळे आपण विनाशाला आमंत्रण देत आहोत,तसे न केल्यास त्याचा फटका भावी पिढ्यांना सोसावा लागेल. ते म्हणाले,चाकुलिया,गिरिडीह, साहेबगंज आणि दुमका येथे जैवविविधता उद्यानांची निर्मिती केली जात आहे.वनक्षेत्रात लावले जाणार नाही,याशिवाय मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी राज्यातील वनक्षेत्रात सॉ मशीन लावण्यावरही बंदी घातली आहे. याअंतर्गत वनक्षेत्राच्या पाच किलोमीटरच्या परिघात करवतीचा कारखाना उभारता येणार नाही. अगोदरच बसवलेले प्लांट काढून टाकण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami