संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 12 August 2022

टीईटी घोटाळ्यातील दोषींना दणका! 7,874 जणांवर कायमची परीक्षा बंदी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पुणे- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) गैरप्रकारात दोषी आढळलेल्या उमेदवारांना मोठा दणका बसला आहे. यातील 7 हजार 874 उमेदवारांवर आता कायमचीच परीक्षा बंदी घातली आहे. त्यांना यापुढे ही परीक्षा देता येणार नाही. त्यामुळे शिक्षक होण्याचे त्यांचे स्वप्न आता कायमचेच भंगले.

महाराष्ट्रातील टीईटी परीक्षा घोटाळ्यातील बोगस शिक्षकांची यादी जाहीर केली होती. 7 हजार 874 जणांनी बोगस गुणांवर शिक्षकाची नोकरी मिळवली होती. या 7 हजार 874 बोगस शिक्षकांची यादी परिषदेने जाहीर केली होती. त्यांना आता यापुढे कायमचीच टीईटी परीक्षा बंदी घातली आहे, असे परिषदेने बुधवारी जाहीर केले. त्यामुळे या दोषींना मोठा दणका बसला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami