संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 23 May 2022

टोंगाच्या समुद्रात ज्वालामुखीचा उद्रेक; अमेरिका ऑस्ट्रेलियाला अलर्ट जारी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email
Print

वेलिंग्टन – न्यूझीलंडजवळ पॅसिफिक महासागराच्या किनारपट्टीवर असलेल्या टोंगामध्ये समुद्रात ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे. टोंगामध्ये गेल्या 30 वर्षातील हा सर्वात मोठा ज्वालामुखीचा स्फोट आहे. यानंतर टोंगामध्ये त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. टोंगात समुद्राखाली झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर जपानला त्सुनामीचा तडाखा बसला आहे. यानंतर किनारपट्टीजवळ राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. अनेकांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात येत आहे. नागरिकांनी समुद्रकिनारी जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.

टोंगामधील ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टी, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडलाही त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास सज्ज असल्याचे न्यूझीलंडच्या सैन्य दलाने म्हटल आहे. संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून असून गरज पडल्यास मदतीसाठी सज्ज आहोत ते न्यूझीलंड सैन्य दलाने सांगितले आहे.

न्यूझीलंड लष्कराने सांगितले की, ते परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि गरज पडल्यास मदत मागितली तर ते तयार आहे. उपग्रहातून घेण्यात आलेल्या फोटोंमध्ये प्रशांत महासागराच्या निळ्या पाण्यावर पसरलेली राख, वाफ आणि वायू दिसत आहे. टोंगा हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण टोंगासाठी सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला आहे. आणि पॅसिफिक त्सुनामी चेतावणी केंद्राच्या डेटामध्ये ८० सेमीपर्यंत उंच लाटा आढळल्या आहेत. अमेरिकन रहिवाशांना त्सुनामीचा इशारा देखील देण्यात आला होता. तसेच किनाऱ्यालगत राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami