संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 18 August 2022

ट्रेकिंगसाठी गेलेल्या विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पुणे : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात रायरेश्वर किल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या एका १७ वर्षांच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे.शुभम प्रदीप चोपडे असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. शुक्रवारी त्याच्या महाविद्यालयाची सहल रायरेश्वर किल्ला परिसरात आली होती. यावेळी हृदयविकाराच्या झटक्याने शुभमचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

शुभम बारामतीतील शारदाबाई पवार कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत असून रायरेश्वर किल्ला परिसरात सहल नेण्यात आली होती.यावेळी मुलांनी शिक्षकांसह रायरेश्वर किल्ला चढायला सुरुवात केली. कोरले गावाजवळ शुभमला हृदयविकाराच्या झटका आला. तो बेशुद्ध पडला त्यानंतर त्याला तातडीने प्राथमिक केंद्र अंबवडे तालुका भोर या ठिकाणी उपचारासाठी नेण्यात आले होते. मात्र उपचारापूर्वीच शुभम याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले, अशी माहिती भोर तालुक्याच्या तहसीलदारांनी दिली. शुभम हा सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील उंब्रट गावचा मूळ रहिवाशी असून बारामतीत तो शिक्षणासाठी आला होता. त्याच्या अशा मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami