संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 16 August 2022

ट्विटर, इंस्टाग्राम काहीवेळ चालेना; नेटकरी हैराण

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – इंस्टाग्राम आणि ट्विटर या लोकप्रिय सोशल माध्यमांनी आज हजारो नेटकऱ्यांची निराशा केली. आज ही दोन्ही माध्यमे काही काळासाठी बंद झाली होती. याबाबत अनेक नेटकऱ्यांनी इतर माध्यमांतून आपल्या तक्रारी नोंदवल्या. शिवाय काही तासांतच फेसबुकवर याबाबत अनेक मिम्स तयार झाले.

‘तुमच्यापैकी काहींना ट्विटर उघडण्यास समस्या येत आहेत. आम्ही ते पुन्हा सुरू करण्यासाठी काम करत आहोत. धन्यवाद’, अशी माहिती ट्विटरने आपल्या ग्राहकांना दिली होती. तर, सेवा पुन्हा सुरू झाल्यानंतर ‘आणि आम्ही परत आलो आहोत! आमच्या अंतर्गत प्रणालींमध्ये काही अडचणी होत्या ज्यामुळे जागतिक स्तरावर तुमच्यापैकी अनेकांना समस्या आल्या. आता ट्विटर अपेक्षेप्रमाणे सुरू असायला हवे. व्यत्ययाबद्दल क्षमस्व’, असे म्हणत ट्विटरने आपल्या ग्राहकांची माफी मागितली. तसेच दुसरीकडे इंस्टाग्राम जवळपास १२ तास नेहमीप्रमाणे सुरळीत कार्यरत नव्हते. वापरकर्त्यांना इंस्टाग्रामवरून मेसेज पाठवण्यातही अडथळे येत होते, त्यामुळे ते काही काळासाठी निराश झाले. दरम्यान, यापूर्वी २५ मे रोजीदेखील इंस्टाग्राम काही काळासाठी ठप्प झाले होते.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami