मुंबई – मेट्रो आरे कारशेडच्या मुद्यावरून भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अहंकार आणि स्वार्थामुळे मेट्रो आरे कारशेडचे काम बंद पडले. त्यांच्या निर्णयामुळे मेट्रो 3 चे काम 3 वर्षे पुढे गेले, यामुळे 10 हजार कोटींनी या प्रकल्पाची किंमत वाढली असल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला.
पुढे सोमय्या म्हणाले की, कांजुरमार्ग येथील जागा कारशेडसाठी उपलब्ध होऊ शकणार नाही, हे उद्धव ठाकरेंना माहीत होते. याबाबत ठाकरेंनी नेमलेल्या समितीनेही आपल्या अहवालात स्पष्टपणे सांगितले होते की, कांजुरमार्गची जागा सहजासहजी उपलब्ध होणार नाही. कांजुरमार्गला कारशेड हलवण्याचा निर्णय घेतला तर मेट्रो 4 वर्षे मागे जाईल आणि त्यामुळे किंमत प्रचंड वाढेल, असेही अधिकार्यांनी आणि तज्ज्ञांनी सांगितलेले होते. मात्र तरीही स्वार्थामुळे आरे कारशेडची जागा बदलण्याचा निर्णय तत्कालीन सरकारने घेतला होता. ठाकरे सरकारच्या निर्णयामुळे मेट्रो 3 चे काम 3 वर्षे पुढे गेले. यामुळे 10 हजार कोटींनी या प्रकल्पाची किंमत वाढली याला जबाबदार उद्धव ठाकरेच असल्याचा आरोपही किरीट सोमय्यांनी
केला आहे.