संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 12 August 2022

ठाकरे सरकार कोसळताच बच्चू कडूंची फाईल बंद! अकोल्यात क्लीनचिट

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे ठाकरे सरकारवर नामुष्की ओढवून हे सरकारच कोसळले आहे. या शिंदे गटात आमदार बच्चू कडू यांचाही समावेश होता. एकाबाजूला ठाकरे सरकार कोसळले आणि दुसरीकडे बच्चू कडू यांना एका गैरव्यवहार प्रकरणी क्लीन चीट मिळाली आहे.

बंडखोर आमदारांमध्ये सामील असलेल्या बच्चू कडू यांना एका गैरव्यवहार प्रकरणी अकोल्यात क्लीन चिट देण्यात आली आहे. रस्त्याच्या कामात गैरव्यवहार केल्याचा आरोप बच्चू कडू यांच्यावर होता. न्यायालयाच्या आदेशानुसार बच्चू कडू यांच्या वर गुन्हे दाखल करण्यात आले होते. दरम्यान बच्चू कडू सध्या एकनाथ शिंदे या गटात असून एक शिंदे गट भाजप सोबत सत्ता स्थापनेत सहभागी होणार आहे. अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांना तीन रस्त्यांच्या कामात गैरव्यवहार केल्याच्या प्रकरणातून क्लीनचीट काल क्लीन चिट मिळाली आहे. अस्तित्वात नसलेल्या तीन रस्त्यांच्या कामात तब्बल एक कोटी ९५ लाखांच्या गैरव्यवहाराचा आरोप त्यांच्यावर लादन्यात आला होता.वंचित बहूजन आघाडीच्या तक्रारीनंतर त्यांच्यावर हे आरोप झाले होते. हे प्रकरण कोर्टात दाखल करण्यात आले होते. न्यायालयाच्या आदेशानंतर सिटी कोतवाली पोलिसांत बच्चू कडू यांच्यावर फसवणूकीचे गुन्हे दाखल झाले. संपुर्ण प्रकरणात पुरावे नसल्याने प्रकरणच तथ्यहिन असल्याचे कोतवाली पोलिसांकडून स्पष्टीकरण देण्यात आले. या प्रकरणाची फाईल आता अकोला पोलिसांनी बंद केली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami