संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 16 August 2022

ठाण्यात पाण्याची टाकी फुटून तब्बल २१ घरांचे नुकसान

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

ठाणे : ठाणे महानगरपालिकेची ७५ हजार लिटर पिण्याच्या पाण्याची रीमोटँक टाकी फुटल्याची घटना घडली आहे.या दुर्घटनेत तब्बल २१ घरांचे नुकसान झाले आहे.यामध्ये ६ घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ७५ वर्षीय तानुबाई श्रवण मुठे या आजीबाई जखमी झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षेने दिली आहे. ही घटना आज सकाळी साडेसहा वाजता वागळे इस्टेट रोड क्रमांक ३३,रुपादेवी टेकडी या ठिकाणी घडली आहे.

ठाण्यात महालक्ष्मी मंदिराजवळ, ख्रिश्चन कब्रिस्तानसमोर असलेली २००९ साली बांधण्यात आलेली ऑस्ट्रेलियन बनावटीची ठाणे महानगरपालिकेची ७५ हजार लिटर पिण्याच्या पाण्याची (रीनोटँक) टाकी सकाळी फुटली. त्यानंतर काही क्षणातच टाकीतील पाणी जवळच असलेल्या झोपडपट्टीतील शिरले. त्यामुळे पाण्याच्या दाबाने त्या झोपडपट्टीतील घरांच्या भिंती व छप्पर तुटून मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली आहे.या दुर्घटनेत तानुबाई मुठे या आजीबाईंचा उजव्या पायासह उजव्या हाताला व कंबरेला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना तातडीने लोकमान्य नगर येथील लोकमान्य हॉस्पिटलात उपचारासाठी दाखल केले आहे. तर घटनास्थळी ६-घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. इतर १५-घरांचे किरकोळ नुकसान झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अविनाश सावंत यांनी दिली.त्यानुसार घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी व कर्मचारी, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान, अधिकारी, वागळे पोलीस कर्मचारी, यांच्यासह स्थानिक माजी नगरसेवकांनी धाव घेतली .

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami