संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 17 August 2022

डेन्मार्कच्या फॅरो बेटावर प्रथेच्या नावाखाली शेकडो डॉल्फिनची कत्तल

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

कोपनहेन- डेन्मार्कच्या फॅरो बेटावर प्रथेच्या नावाखाली एका दिवसात शेकडो डॉल्फिनची लोकांनी कत्तल केली. हा प्रकार इतका भयंकर होता की, त्यामुळे समुद्राचे पाणी रक्ताने लाल झाले. याच्या विरोधात प्राणी प्रेमींनी आवाज उठवला आहे. हे अतिशय क्रूर कृत्य असल्याची प्रतिक्रिया प्राणी हक्क संघटनांनी व्यक्त केली.

प्रथेनुसार शिकारीच्या नावाखाली डेन्मार्कमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात डॉल्फिनची कत्तल केली जाते. खोल समुद्रातील डॉल्फिनला बोटींच्या मदतीने हाकलून फॅरो बेटाच्या किनाऱ्यावर आणले जाते. त्यानंतर किनाऱ्यावर उभे असलेले नागरिक चाकूने त्यांची शिकार करतात. अंगावर शहारे आणणारा हा प्रकार असतो. मात्र प्रथेच्या नावाखाली हा क्रूर प्रकार अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्राणी मित्र संघटनांनी विरोध केला आहे. फॅरोच्या किनाऱ्यावर शेकडो मृत डॉल्फिन ठेवले जातात. त्यांच्या रक्ताने समुद्र अक्षरशः लाल होतो. एवढी ही आघोरी प्रथा आहे. त्याचा आंतरराष्ट्रीय स्तरातून निषेध केला जात आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami