संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 15 August 2022

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे प्रतापसिंह हायस्कूल राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्याची मागणी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

सातारा : भारतीय राज्यघटनेचे जनक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित दोन स्थळांना राष्ट्रीय स्मारके म्हणून घोषित करावे अशी शिफारस राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाने केली आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी प्राथमिक शिक्षण घेतलेले प्रतापसिंह हायस्कूल आणि वडोदरा येथील ‘संकल्प भूमी वटवृक्ष’ परिसर स्थळ ही महत्त्वाची ठिकाणे राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावी, अशी शिफारस करण्यात आली आहे

भीमराव रामजी आंबेडकर यांनी प्रतापसिंह हायस्कूलमध्ये प्राथमिक शिक्षण घेतले आहे. आंबेडकर यांनी मराठी स्वाक्षऱ्या केलेली नोंदवहीसुद्धा ह्या शाळेने जपून ठेवली आहे. ही शाळा १०० वर्षे जुनी असून सध्या जिल्हापरिषदेच्या अखत्यारीत असलेल्या ह्या शाळेची दुरवस्था झाली आहे. २३ सप्टेंबर १९१७ रोजी वडोदरा येथील ‘संकल्प भूमी वटवृक्ष’ परिसरात आंबेडकरांनी अस्पृश्यता निर्मूलनाचा संपर्क केला होता.त्यामुळे ही दोन्ही ठिकाणे महत्वाची असून राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावी अशा शिफारशी राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाने संस्कृती राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्यासमोर सादर केल्या आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami