संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 13 August 2022

तानसा धरण ओसंडून वहण्याची शक्यता

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पालघर दि 14 : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या तानसा धरणाची पातळी १२८.१७ मी. इतकी असून . तानसा धरण आसंडुन (overflow) वाहण्याची पातळी १२८.६३ मी. इतकी आहे. तानसा धरण परिसरात सतत पर्जन्यवृष्टी होत असुन धरण परिसरातील सध्याचे पावसाचे प्रमाण लक्षात घेता तानसा धरण लवकरच भरुण वाहण्याची (Overflow) शक्यता आहे.

तरी तानसा धरणाखालील व तानसा नदीलगतच्या, आजुबाजुच्या परिसरातील गावांना, रहीवाश्यांना तानसा धरण भरून वाहण्याची (Overflow) कल्पना देण्यात आली असून सावध राहण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. तसेच संबंधित सर्व शासकिय यंत्रणा, तहसिल कार्यालय, पोलिस यंत्रणा व सर्व संबंधित अधिकारी यांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ माणिक गुरसळ यांनी दिले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami