कोलकता – शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी ईडी अधिकार्यांनी तृणमुल काँग्रेसचे नेते आणि पश्चिम बंगालचे मंत्री पार्थ चॅटर्जी यांची शुक्रवारी सकाळी 8 वाजता त्यांच्या दक्षिण कोलकाता येथील निवासस्थानी चौकशी सुरू केली होती आणि त्यांची चौकशी अधिकार्यांनी रात्रभर सुरुच ठेवत आज सकाळी 24 तासांनी संपली.त्यानंतर त्यांना ईडीच्या अधिकार्यांनी अटक केल्याने एकच खळबळ उडाली.
ईडीच्या अधिकार्यांनी दक्षिण कोलकाता येथील चॅटर्जी यांच्या जवळच्या निकटवर्गीय अभिनेत्री अर्पिता मुखर्जीच्या घरातून 20 कोटी रुपये रोख जप्त केले. हा घोटाळा झाला तेव्हा चटर्जी राज्याचे शिक्षण मंत्री होते आणि ईडी त्यात कथितपणे सहभागी असलेल्यांची चौकशी करत आहे. त्यांची शुक्रवारी पश्चिम बंगाल शाळा सेवा आयोगमधील भरती अनियमिततेच्या संदर्भात ईडीच्या चौकशीला सामोरे जात असताना आजारी देखील पडले होते. दुपारी 3 वाजल्यानंतर चॅटर्जी यांनी अस्वस्थता आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याची तक्रार केली होती. ईडीच्या अधिकार्यांनी मंत्र्यांच्या सहाय्यकांच्या मदतीने तत्काळ त्यांच्या वैयक्तिक डॉक्टरांना माहिती दिली. काही वेळातच तीन डॉक्टरांचे एक पथक चटर्जी यांच्या निवासस्थानी पोहचले, त्यांची तपासणी केली आणि काही औषधे दिली. चॅटर्जी यांना आराम वाटला, परंतु, डॉक्टरांनी त्यांना ईसीजी करण्याचा सल्ला दिला. मात्र, ईडीच्या अधिकार्यांनी त्यांची चौकशी सुरूच ठेवली. आणखी गरज भासू शकते म्हणून ॅक्टारांना ठदुसर्या खोलीत ठेवण्यात आले होते. ईडीच्या अधिकार्यांची त्यांची रात्रभर चौकशी सुरु ठेवली. ही चौकशी आज सकाळी 24 तासांनी संपली आणि त्यानंतर त्यांना अधिकार्यांनी अटक केली.