संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 12 August 2022

दलित असल्याने प्रशासनाकडून उपेक्षा! योगी मंत्रिमंडळातील मंत्र्यांचा राजीनामा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

लखनौ – या देशात गावपातळीपासून प्रशासनापर्यंत कशाप्रकारे जातीयवाद पसरला आहे ते पुन्हा एकदा दिसून आले आहे. केवळ दलित असल्यामुळे प्रशासनातील अधिकारी आपले ऐकत नाहीत, असा आरोप करून योगी मंत्रिमंडळातील एका राज्य मंत्र्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

उत्तर प्रदेशातील योगी मंत्रिमंडळातील जलशक्ती राज्यमंत्री दिनेश खाटीक हे गेल्या काही महिन्यांपासून नाराज होते.कारण प्रशासनातील त्यांच्या विभागाचे अधिकारी त्यांचे काहीच एकूण घेत नाहीत. याबाबत मुख्य सचिवांकडे तक्रार करायला गेल्यास, ते खाटीक यांचा फोनही घेत नव्हते. हि बाब त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कानावर घातली होती . पण त्यांनीही याकडे लक्ष दिले नाही. शेवटी दिनेश खाटीक यांनी आपल्या राज्यमंत्रीपदाचा आज राजीनामा दिला. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा , मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्याकडे आपला राजीनामा पाठवला आहे. खाटीक यांच्या राजीनाम्याचे तीव्र पडसाद उत्तर प्रदेश विधानसभेत उमटण्याची शक्यता आहे. दरम्यान याबाबत चौकशी करून पुढील कारवाई करू असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले. देशाच्या इतरही काही राज्यांमध्ये असे प्रकार उघडकीस आले होते . त्यामुळे सत्तेतील आणि प्रशासनातील उच्चं वर्णियांची मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे. असे दलित संघटनांनी म्हटले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami